
Garbage Plant Controversy
Sakal
आंबेगाव : ‘येथील स्थानिकांची डोकेदुखी ठरत असलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थानिकांच्या माथी कोणी मारला आहे? पाच वर्षे सत्तेत असताना इतर नेत्यांनी काय केले आहे ते तरी दाखवा. आंबेगावकरांना नरकयातना देणारा कचरा प्रकल्प कोणी आणला आणि संबंधित प्रकल्पामध्ये कुणाची भागीदारी आहे?’ असा संतप्त सवाल पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांनी केला. आमदार शिवतारे यांच्या प्रयत्नातून व पुणे महापालिकेच्या पाच कोटी रुपये निधीतून साकारत असणाऱ्या जांभूळवाडी तलावाच्या सांडवा पुलाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.