
पुण्यातील खराडी परिसरात शनिवारी रात्री उशिरा रेव्ह पार्टीवर छापा टाकण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला नेत्या रोहिणी खडसे यांच्या पतीला अटक करण्यात आलीय. खराडीतील एका फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार छापा टाकला असता पार्टीत अमली पदार्थ, दारू आणि हुक्का आढळून आले. पोलिसांनी दोन महिलांसह पाच पुरुषांना अटक केलीय. यात रोहिणी खडसेंचे पती डॉक्टर प्रांजल खेवलकर असल्याची माहिती समोर येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.