

Sunil Bansode
esakal
आंदेकर झाले, घायवळ झाला आणि आता मारणे गँगची बारी... पुणे पोलिस शहरातील गुन्हेगारी संपवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आंदेकर आणि घायवळ टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. सध्या आंदेकर गँग जेलमध्ये आहे, तर घायवळ फरार आहे; पण त्याच्या टोळीतील सदस्यांवर मात्र कारवाई सुरू आहे. पुण्यात भडकलेले टोळीयुद्ध पाहता आता पोलिसांनी गजा मारणेच्या गँगच्या मुसक्याही आवळायला सुरुवात केली आहे. कारण मारणेचा लेफ्ट हँड मानला जाणारा सुनील बनसोडे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे सुनील बनसोडे कोण? पाहूया...