पुणे- सोलापूर महामार्गाला वाली कोण

हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग की आनखी कोणाकडे येतो याचीच नेमकी माहीत कोणाकडे नसल्याने, रस्त्याची डागडुजी अथवा साफसफाईही मागील दोन वर्षात होऊ शकलेली नाही.
पुणे- सोलापूर महामार्गाला वाली कोण
पुणे- सोलापूर महामार्गाला वाली कोण sakal

लोणी काळभोर : पुणे- सोलापुर महामार्गवरील (pune solapur highway) कदमवाक वस्ती (ता. हवेली) हद्दीतील कवडीपाट ते कासुर्डी (ता. दौंड ) या दरम्यानचा रस्ता सतरा वर्षापुर्वी "बाधा, वापरा व हस्तातंरीत करा (बिओटी)" या तत्वानुसार आयआरबी (IRB) या खाजगी कंपनीने विकसीत केला होता. मात्र दोन वर्षापुर्वी मुदत संपल्याने दोन वर्षापुर्वी आयआरबी (IRB) कंपनीने वरील रस्ता शासनाकडे हस्तातंरीत केला. (who is the resposibilities pune solapur highway)

हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग की आनखी कोणाकडे येतो याचीच नेमकी माहीत कोणाकडे नसल्याने, रस्त्याची डागडुजी अथवा साफसफाईही मागील दोन वर्षात होऊ शकलेली नाही. कवडीपाट टोलनाका मुदत संपल्याने बंद करण्यात आल्याने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. तब्बल अर्धा फूट खोल खड्ड्यांमुळे मोटारसायकल चालकांचे अपघात होऊन गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागले आहे.

पुणे- सोलापूर महामार्गाला वाली कोण
पुण्याच्या देविका घोरपडेला सुवर्णपदक

कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील दत्त मंदिराजवळ असणाऱ्या एका नर्सरी व्यावसायिकाने महामार्ग व सेवा रस्त्यावरच दुकान थाटले आहे. हा व्यावसायिक रस्त्यावरच खुलेआम रोपांची विक्री करीत असून नर्सरीतील रोपांची विक्री करण्यासाठी सेवा रस्त्यासाहित महामार्गावरील एका लेनमध्ये गाड्या लावल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच या ठिकाणी महामार्गावरील रस्त्याच्या कडेला कायम मातीचा खच जमा झालेला असून या मातीवरून घसरून आजपर्यंत बरेच दुचाकी चालक जखमी व मृत झालेले आहेत. यामुळे सदर ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून प्रवासी, वाहन चालक व वाटसरू यांना हकनाक त्रास होत आहे.

सेवा रस्त्यावर असलेल्या लोखंडी कुंपणाच्या जाळ्या वाकड्या तसेच मोडलेल्या अवस्थेत असून सेवा रस्त्यावरून येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. विविध व्यावसायिकांनी आपापल्या व्यवसायाची जाहिरात म्हणून बोर्ड लावलेले लावले आहेत. लोणी काळभोर ते उरुळी कांचन या ग्रामपंचायत हद्दीतील महामार्गाच्या बाजूला असलेल्या अनेक ठिकाणी रस्त्याच्या पृष्ठभागाचा असमतोल, कमी उंचीचे रस्ता दुभाजक, पुसलेले झेब्रा क्रॉसिंग, खचलेल्या साईड पट्टया, मुख्य रस्ता च सेवा रस्त्यादरम्यान तुटलेल्या जाळ्या, धोक्याच्या व अपघाताच्या ठिकाणी आढळून येत आहेत.

पुणे- सोलापूर महामार्गाला वाली कोण
पुणे : नीरा-देवघर धरण १०० टक्के भरले

दरम्यान, पावसाने अजूनही जोर धरलेला नाही. मधूनच येणाऱ्या पावसाच्या हलक्या सरींनी लोणी काळभोर, कुंजीरवाडी, कोरेगाव मूळ या ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या महामार्गाच्या मध्येच पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत मुख्य रस्त्यावर पाणी साचून निर्माण होणारे तळे त्रासदायक ठरत आहेत. रस्त्यांच्या कामाच्या वेळी पावसाच्या पाण्याच्या निचरा करण्याची व्यवस्थाच केली नसल्याने ही समस्या निर्माण होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com