

Vidyanand Bapat raised objections to DJ and loudspeaker use during Pune Municipal Corporation's Ganeshotsav preparation meeting.
esakal
पुणे : गणेशोत्सव २०२६च्या पूर्वतयारीसाठी पुणे महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांच्या वापराचा मुद्दा चांगलाच गाजला. नारायण पेठेतील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सवात डीजे आणि मोठ्या आवाजातील लाऊडस्पीकरवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली. त्यांच्या या भूमिकेला गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विद्यानंद बापट चर्चेत आले.