रस्त्यावर अपघातांमध्ये गमावलेल्या जिवांना जबाबदार कोण?

अनिल सावळे
Tuesday, 19 January 2021

खडकवासला चौपाटीजवळ रस्त्याच्या कडेला उभी केलेली वाहने... विक्रेत्यांच्या हातगाड्या... नांदेड फाटा ते डोणजेपर्यंत प्रत्येक गावातून जाणारे अरुंद रस्ते... याची परिणती प्रत्येक शनिवार-रविवारी वाहतूक कोंडीत होते. नांदेड फाटा ते डोणजेपर्यंत रस्त्याची कामे अपूर्ण असून, वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दुर्लक्ष होत आहे.

पुणे - खडकवासला चौपाटीजवळ रस्त्याच्या कडेला उभी केलेली वाहने... विक्रेत्यांच्या हातगाड्या... नांदेड फाटा ते डोणजेपर्यंत प्रत्येक गावातून जाणारे अरुंद रस्ते... याची परिणती प्रत्येक शनिवार-रविवारी वाहतूक कोंडीत होते. नांदेड फाटा ते डोणजेपर्यंत रस्त्याची कामे अपूर्ण असून, वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दुर्लक्ष होत आहे. हवेली पोलिसांच्या माहितीनुसार, या रस्त्यावर अपघातांमध्ये वर्षभरात पाच जणांना जीव गमवावा लागला आहे, तर १५ जण गंभीर जखमी झाले. याला जबाबदार कोण?

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नांदेड फाटा ते डोणजे गावापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी हे काम सुरू करण्यात आले; परंतु आजही अर्धवट कामांमुळे हा रस्ता वाहनचालकांसाठी धोकादायक आहे. खडकवासला धरणाजवळ चौकातील चारशे मीटरचा रस्ता वन विभागाच्या अखत्यारीत आहे. तेथील रस्त्याचे काम परवानगी न मिळाल्याने रखडले आहे. महावितरणला वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे विजेचे खांब काढून भूमिगत लाइन टाकावी लागणार आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांसोबत स्थानिक रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, यासाठी रहिवाशांनी आंदोलनेही केली; परंतु अजूनही हा प्रश्‍न मार्गी लागलेला नाही. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासोबतच स्थानिक पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.

किंमत एका मताची : नातवाला विजयी करून, आज्जीने घेतला जगाचा निरोप

दोन वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. कामात सलगता असायला हवी. काँक्रिटीकरणासाठी आणलेले मशिन कधी डोणजे बाजूला, तर कधी नांदेड फाट्याकडे सारखी ने-आण सुरू असते. ज्या ठिकाणी खोदकाम केले आहे, तेथे नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नाही.
- सुशांत खिरीड, नागरिक, गोऱ्हे बुद्रुक

पार्टनरशिपचं आमिष दाखवलं अन् पुणेकराला दोन मुंबईकरांनी लुटलं!

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. ठेकेदार रात्रीच्या वेळी रस्त्याचे काम करत असल्यामुळे अधिकारी त्या वेळी नसतात. अनेक ठिकाणी रस्ता खाली-वर झाला आहे. कामाच्या वेगाबरोबरच दर्जाही चांगला असावा.
- नरेंद्र हगवणे, वास्तुविशारद, किरकटवाडी

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who is responsible for the lives lost in road accidents