
Petrol Pump Toilets
Sakal
पुणे : शहरात महिलांच्या स्वच्छतागृहांची संख्या कमी आहे, नव्याने स्वच्छतागृह बांधण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे शहरातील सुमारे २५० पेट्रोल पंपांवरील स्वच्छतागृह महिलांना वापरता आले पाहिजेत यासाठी राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.