DSK: का उघडला DSK यांचा जप्त केलेला बंगला? ईडीच्या उपस्थितीत कुलकर्णी कार्यालयात दाखल

DSK: दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांना येथील विशेष न्यायालयाने परवानगी दिली होती. बंगला आणि कार्यालयात असलेली कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेण्यासाठी डीएसके यांनी अर्ज केला होता.
DSK
DSKEsakal

ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या बंगल्यात आणि कार्यालयात जाण्यास दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांना येथील विशेष न्यायालयाने परवानगी दिली होती. बंगला आणि कार्यालयात असलेली कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेण्यासाठी डीएसके यांनी अर्ज केला होता. आज त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

डीएसके यांचा सेनापती बापट रस्त्यावर सप्तशृंगी नावाचा बंगला आहे. तर डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचे जंगली महाराज रस्त्यावर कार्यालय आहे. डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीने या दोन्ही मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या.

DSK
DSK : ईडीने जप्त केलेल्या बंगल्यात जाण्यास डिएसकेंना परवानगी

या दोन्ही ठिकाणी माझी अनेक कागदपत्रे आहेत. त्यासाठी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणेदेखील आहेत. ज्यांचा उपयोग माझ्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये माझी बाजू मांडण्यासाठी होवू शकतो. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी जाऊन कागदपत्रे आणि उपकरणे ताब्यात घेण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी करणारा अर्ज डीएसके यांनी या प्रकरणातील विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या न्यायालयात केला होता. त्यानुसार न्यायालयाने ही परवानगी दिली होती.

DSK
Railway News: मुंबई ते गोरखपुर-दानापुर दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

दरम्यान, डीएसके आणि कुटुंबीयांना त्यात प्रवेश देवून त्यांनी त्यांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या प्रकरणांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जमा करावीत. या सर्व प्रक्रियेचा पंचनामा करून कागदपत्रांच्या योग्य वर्णनासह यादी नोंदवून ठेवावी. ईडी आणि डीएसके यांनी या आदेशाच्या पूर्ततेचा अहवाल १५ दिवसांत सादर करावा.

ईडी आणि डीएसके असे दोघेही प्रवेश आणि कागदपत्रे घेतानाचे व्हिडिओ शूटिंग घेऊ शकतात. कागदपत्रे घेतल्यानंतर बंगला आणि कार्यालय पुन्हा बंद करण्यात यावे, असे आदेशात नमूद आहे. या आदेशाची अंमलबजावणी आज करण्यात आली आहे.

DSK
Solapur Lok Sabha: प्रणिती शिंदेंच्या नावे 'इतक्या' कोटींची मालमत्ता; ५ वर्षांत मालमत्तेत १.८१ कोटींची वाढ

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com