Suspension of MP: खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात वारजेमध्ये राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन

नागरिकांच्या प्रश्नासाठी संविधानिक पद्धतीने संसदेत आवाज उठविणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे व खासदार अमोल कोल्हे यांचे निलंबन
Suspension of MP: खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात वारजेमध्ये राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन
Updated on: 

वारजे : शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी संविधानिक पद्धतीने संसदेत आवाज उठविणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे व खासदार अमोल कोल्हे यांचे निलंबन मोदी सरकारने केल्याने या हुकूमशाहीच्या विरोधात वारजेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार गट ) वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

वारजे येथील स्वर्गीय आमदार रमेशभाऊ वांजळे चौकात ( वारजे उड्डाणपूल चौक )मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या हुकूमशाहीचा धिक्कार असो,

मागे घ्या मागे घ्या निलंबन मागे घ्या, जवाब दो,जवाब दो, मोदी सरकार जवाब दो, नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी, मोदी, शहा डरता है पोलीस को आगे करता है आशा घोषणा देत मोदी सरकारचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला.

एकाच वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदार निलंबित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही लोकशाही आहे की हुकूमशाही आहे. असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष (शरद पवार गट ) प्रशांत जगताप यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, डॉ. शशिकांत जगताप, काका चव्हाण, सचिन दोडके, स्वप्नील दुधाने, स्वाती चिटणीस, किशोर कांबळे, महादेव कोढरे, स्वाती पोकळे, मनाली भिलारे, शरद दबडे, प्रभावती भुमकर, सुरेखा दमिष्ठे, अनिता इंगळे, निलम डोळसकर, रवि वांजळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MPSC students stage a protest near S. M. Joshi Bridge in Pune, demanding the resignation of MPSC Chairman Vivek Bhimnawar and transparent offline examinations
Gyanesh Kumar Resignation cockroch janata party
MPSC Students Protest
Sinhgad employees protest over 20 months of unpaid salaries.
Marathi News Esakal
www.esakal.com