पाळीव प्राण्यांच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांची ससेहोलपट

पाळीव प्राण्यांच्या भरपाईसाठी 
शेतकऱ्यांची ससेहोलपट
Published on

उत्रौली, ता. १२ : भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यात बिबट्या आणि वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव प्राणी मृत्यूमुखी पडतात. पाळीव प्राण्यांची नुकसान भरपाई वनखात्याच्या मार्फत दिली जाते. मात्र, किचकट प्रक्रिया, वेळेचे बंधन, कागदपत्रांची जुळवाजुळव करूनही अनेक वेळा भरपाई मिळताना अडचणींचा सामना करावा लागत असून काहींना भरपाईपासून वंचित रहावे लागते. त्यामुळे नुकसान भरपाईसाठीच्या जाचक अटी शिथिल करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
डोंगर रांगेतील वनखात्याच्या संरक्षित जंगलामध्ये वृक्षसंपदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा अधिवास वाढला आहे. शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीबरोबर पशुधन, बकऱ्या, मेंढ्या पाळतात. शेतकऱ्यांची बहुतांशी शेती, चराऊ राने डोंगर उतारावर असल्याने शेतकरी पशुधन चारण्यासाठी या परिसरात नेतात. मात्र, दबा धरून बसलेल्या बिबट्यासारख्या प्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पशुधन पडते.
पाळीव प्राणी मृत्युमुखी पडल्यावर बिबट्यासारखे प्राणी दाट जंगलात नेऊन ठेवतात. त्यामुळे नुकसान भरपाई मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना मुत्युमुखी पडलेल्या प्राण्यांचे अवशेष शोधणे, २४ तासांच्या आत आॅनलाईन फार्म भरणे, अवशेष सापडले तर शवविच्छेदन करून रिपोर्ट जमा करणे, आवश्यक कागदपत्र गोळा करणे अशी किचकट प्रक्रिया करण्यास दिरंगाई होते. तर काही अटींची पुर्तता करणे अवघड जाते.
अनेक वेळा मृत जनावरांचे अवशेष सापडत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पासून मुकावे लागते. अशा घटनांमध्ये शेतकऱ्यांचे हजारो रुपयांपासून लाखो रुपयांचे नुकसान होते. यासाठी शेतकऱ्यांचा वाया जाणारा वेळ, पैसा, श्रम आणि मनस्तापापासून सुटका व्हावी यासाठी नुकसान भरपाई प्रक्रियेत बदल व्हावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.


पाळीव प्राण्यांच्या नुकसान भरपाईसाठी पुरावे
-वनरक्षकाचा तपासणी,पंचनामा अहवाल
-पशुवैद्यकीय प्रमाणपत्र
-अर्जदाराचे ओळख व बँक कागदपत्रे
-घटनेच्या ठिकाणचे व मृत प्राण्याचे फोटो (अक्षांश, रेखांश, वेळ, ठिकाणासह फोटो)


वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मुत्युमुखी पडलेल्या पाळीव जनावरांच्या मालकांना वनखात्याच्या वतीने नुकसान भरपाई दिली जाते. नुकसाई भरपाई मिळण्यासाठी मृत जनावर किंवा मृत जनावरांचे अवशेष हा पुरावा आवश्यक आहे.
-शिवाजी राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी, भोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com