

Forest officials display seized pangolin scales and sambar antlers after arresting two suspects in Manchar.
Sakal
पुणे : वन्यजीवांच्या अवैध व्यापाराविरोधात जुन्नर वनविभागाने कारवाई करत भारतीय खवले मांजर (पँगोलिन) आणि सांबर हरिण यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. मंचर परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे तीन किलो भारतीय खवले मांजराचे खवले, तीन नख्या, चार सांबर हरिणांचे शिंगे आणि एक कार जप्त केली आहे.