esakal | पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार- वळसे पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार

पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार

sakal_logo
By
डी के वळसे पाटील

मंचर: “राज्यातील पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत बोलून लवकरच बैठकीचे आयोजन केले जाईल.” असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे यांनी दिले. पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे भीमाशंकर कारखान्याच्या विश्रामगृहावर रविवारी (ता.१२) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वळसे पाटील यांची भेट घेतली.

हेही वाचा: पवना धरणातून विसर्ग सुरू; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

यावेळी शिष्ठ मंडळात परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील लोणकर, परिषदेचे माजी विभागीय चिटणीस डी. के. वळसे पाटील हे उपस्थित होते. देशमुख म्हणाले” राज्यात पुन्हा एकदा पत्रकारांवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गेल्या दोन दिवसात मुंबई, चाकुर, श्रीगोंदा आदि ठिकाणी पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. या प्रकरणातील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी. पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांची कोंडी करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.

एक सत्य बातमी दिल्यामुळे केज येथील पत्रकारांवर खोटा गुन्हा दाखल केला आहे. पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यापुर्वी त्याची सत्यता उपविभागीय स्तरावरील पोलीस अधिकाऱ्यामार्फत तपासून पहावी. पत्रकारांचे पेन्शन व अन्य प़श्न प़लंबित आहेत. पत्रकारांना कोरोना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करावे. १५५ पत्रकारांचे कोरोनाने निधन झाले आहे. अशा सर्व पत्रकारांच्या नातेवाईकांना १० लाख रूपयांचे अनुदान द्यावे. आदी मागण्या सातत्याने सरकारकडे केल्या जात आहेत.

परंतू यासंबंधी कोणताच निर्णय होत नसल्याने वळसे पाटील यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावावी.” पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक (ता.आंबेगाव) राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन चर्चा केली.

loading image
go to top