पोलिस दल सक्षम करणार - रेड्डी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

उत्तरे न देताच गृहराज्यमंत्री बाहेर
गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी पोलिस, पोलिसांचे सक्षमीकरण याविषयी पत्रकारांशी आवर्जून संवाद साधला; परंतु हैदराबाद येथील बलात्कार, खून व एन्काउंटर, उन्नाव येथील बलात्कार पीडितेचे जळीत प्रकरण आदींविषयी पत्रकारांनी प्रश्‍न विचारले. त्या वेळी त्यांनी उत्तरे देण्याचे टाळून, तेथून निघून जाणे पसंत केले.

पुणे - देशातील सर्व राज्यांमधील पोलिस दलाचे सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र शासनाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रत्येक राज्यातील पोलिस दलाला आवश्‍यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी रविवारी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाषाण येथील आयसर संस्थेतील पोलिस महासंचालक परिषदेच्या समारोपानंतर रेड्डी यांनी पोलिस संशोधन केंद्राच्या आवारातील पोलिस स्मृती स्थळाला रविवारी सायंकाळी भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

रेड्डी म्हणाले, ‘‘चित्रपटांमधून पोलिसांची प्रतिमा मलिन केली जाते. पोलिसांकडून एखादी चूक झाल्यानंतर संपूर्ण पोलिस दलाला दोषी धरले जाते. पोलिसांची हीच प्रतिमा सुधारण्यावर जाणीवपूर्वक लक्ष दिले जात आहे. याबरोबरच त्यांना अद्ययावत दर्जाचे प्रशिक्षण देण्यावरही केंद्र सरकार भर देत आहे. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.’’

आणखी वाचा - पंतप्रधानांना निरोप देण्यासाठी भुजबळ पोहोचले; कारण?

पोलिस महासंचालक परिषदेविषयी ते म्हणाले, ‘‘राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचा उद्देश सफल झाला आहे. न्यायवैद्यकीय तपास तसेच अन्य पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विविध राज्यांतील पोलिस दलाला आवश्‍यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will enable the police force