

पुणे - येरवडा येथील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डाच्या म्हाडा कॉलनीतील सर्व्हे क्रमांक १९१-अ मधील सुमारे ४० वर्षे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मुंबईत भेट घेतली. या इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेला गती देऊन ती फास्ट ट्रॅकवर पूर्ण करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.