esakal | लॉकडाउननंतर पालक लगेचच मुलांना शाळेत पाठविणार का? पाहा सर्व्हे काय म्हणतोय!
sakal

बोलून बातमी शोधा

Child

लॉकडाउननंतर शाळा सुरू झाल्यास लगेचच मुलांना शाळेत पाठविण्यास ९२ टक्के पालक तयार नसल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. ‘पॅरेंटस सर्कल’च्या वतीने यासंदर्भात देशव्यापी सर्वेक्षण करण्यात आले.

लॉकडाउननंतर पालक लगेचच मुलांना शाळेत पाठविणार का? पाहा सर्व्हे काय म्हणतोय!

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव

पुणे : लॉकडाउननंतर शाळा सुरू झाल्यास लगेचच मुलांना शाळेत पाठविण्यास ९२ टक्के पालक तयार नसल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. ‘पॅरेंट्स सर्कल’च्या वतीने यासंदर्भात देशव्यापी सर्वेक्षण करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या सर्वेक्षणात देशातील १२ हजार, तर पुण्यातील ३०० पालकांनी सहभाग नोंदविला. बर्थडे पार्टी, रेस्टॉरंट, सहली, सिनेमा टाळण्यावर भर असेल, असे बहुतांश पालकांचे म्हणणे आहे. तसेच यंदा कौटुंबिक सहली रद्द करण्याचा निर्णय ५७.४३ टक्के पालकांनी घेतला आहेत. तर मॉल आणि थिएटरमध्ये जाणार नसल्याचे ५०.०३ टक्के पालकांनी म्हटले आहे.

दिलासादायक : पुण्यात दिवसभरात तब्बल 144 रुग्ण झाले बरे

येत्या शैक्षणिक वर्षात माझा मुलगा पाचवीला जाणार आहे. लॉकडाउन संपल्यानंतर त्याला शाळेत पाठवायचे की नाही ठरविणार आह. लॉकडाउननंतर निदान चार महिने तरी आम्ही हॉटेल, बाग, सिनेमागृह किंवा मॉलमध्ये जाणे टाळणार आहोत. 
- विशाखा राजगुरव, पालक, पुणे स्टेशन

एका वर्गाचे दोन विभाग करून त्याप्रमाणे तासांचे नियोजन करण्यात येईल. सध्या वर्षाचे वेळापत्रक बनविण्यात येत आहे. त्यानंतर ‘सोशल डिस्टन्सिंग’चा विचार करून नियोजन केले जाईल. 
- नेहा पेंढारकर, मुख्याध्यापिका, नूतन मराठी विद्यालय (मुलींची)

loading image
go to top