Coronavirus: वाइन शॉप, देशी दारूची दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

पुणे जिल्ह्यात बिअर बार बंद केल्यानंतर वाइन शॉप, बिअर शॉपी (तारांकित हॉटेल वगळून), देशी दारूविक्रीची दुकाने ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद ठेवावीत, असा आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला.

पुणे - पुणे जिल्ह्यात बिअर बार बंद केल्यानंतर वाइन शॉप, बिअर शॉपी (तारांकित हॉटेल वगळून), देशी दारूविक्रीची दुकाने ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद ठेवावीत, असा आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम- २००५ मधील कलम ३० (२) अन्वये, तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ मधील कलम- १४२ नुसार जिल्ह्यातील वाइन शॉपसह सर्व दारू दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून (ता. २०) सुरू करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात मद्यविक्री बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.
- संतोष झगडे, जिल्हा अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wine shop and country liquor shops to close on March 31