वाईन शॉप, देशी दारूची दुकाने 31 मार्चपर्यंत बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wine shop beer shop will remain closed till 31 march Pune district

कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकारची दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाईन शॉप, देशी दारूची दुकाने 31 मार्चपर्यंत बंद

पुणे Coronavirus : पुणे जिल्ह्यात बिअर बार बंद केल्यानंतर वाईन शॉप, बिअर शॉपी (तारांकीत हॉटेल वगळून), देशी दारू किरकोळ विक्री दुकाने 31 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकारची दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी 20 मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. परदेशातून प्रवासी येत असून, काही परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्‍यक आहे. यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे या बाबी टाळणे आवश्‍यक आहे. या विषाणूची लागण एका संक्रमीत व्यक्‍तीकडून संपर्कात आल्यामुळे इतरांना होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 मधील कलम 30 (2) अन्वये तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील कलम-142 नुसार जिल्ह्यातील वाईन शॉपसह सर्व दारू दुकाने व्यवहार 20 मार्च ते 31 मार्च या कालावधीत पूर्णपणे बंद राहतील. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे.

कोरोना आणि पुण्याशी संंबंधित बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

पान टपऱ्याही बंद
जिल्ह्यातील पान टपऱ्यांवर अकारण होणार गर्दी, टाळण्यासाठी कालच जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व पान टपऱ्या बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार आजपासून जिल्ह्यात पान टपऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. पान टपऱ्यांच्या माध्यमातून पान, गुटखा, तंबाखू थूंकल्यामुळं कोरोनाचे विषाणू पसरण्याचा धोकाही वर्तवण्यात आलाय. त्यामुळंच पान टपऱ्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय.

Web Title: Wine Shop Beer Shop Will Remain Closed Till 31 March Pune District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top