

Pune outdoor fitness
Sakal
पुणे : थंडी आणि शारीरिक तंदुरुस्ती यांचे अतूट नाते आहे. हिवाळ्यात शरीरातील अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करण्याची प्रक्रिया (मेटाबॉलिझम) वेगाने काम करते. या काळात व्यायाम अधिक फायदेशीर ठरतो. पहाटेचे धुके, गुलाबी थंडीची झुळूक अंगावर घेत पुणेकरांची बागा, टेकड्या आणि व्यायामशाळांमध्ये नेहमीच्या तुलनेत दुपटीहून अधिक गर्दी वाढली आहे. शहरातील बागा, टेकड्या, मोकळी मैदाने पुन्हा एकदा गजबजू लागली आहेत.