मसूर परिसरात कडाक्याच्या थंडीमुळे गव्हाला सोनेरी बहर! शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण

मसूर परिसरात कडाक्याच्या थंडीमुळे गव्हाला सोनेरी बहर! शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण

Published on

पोषक थंडीमुळे गहू पीक जोमात

मसूर परिसरातील चित्र; अनुकूल वातावरणामुळे चांगली वाढ

मसूर, ता. ५ : येथील परिसरात गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा गहू पिकाला फायदा होत आहे. शिवारात सध्या गव्हाची जोमदार आणि उत्साहवर्धक वाढ दिसून येत आहे. दर वर्षी जानेवारी- फेब्रुवारी महिन्यातील थंडी गहू पिकास पोषक मानली जाते. यंदा तापमानातील लक्षणीय घसरण गहू उत्पादनाच्या दृष्टीने अनुकूल ठरत असल्याचे चित्र आहे.
गेल्या १५ दिवसांपासून सकाळ आणि संध्याकाळी थंडी जाणवत आहे. त्यामुळे गहू पिकाची पाने गडद हिरवी, तजेलदार आणि सशक्त दिसत आहेत. दिवसा मध्यम, तर रात्री नीचांकी तापमान अशी हवामानाची स्थिती गहू पिकाच्या वाढीसाठी आदर्श असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. या वातावरणामुळे मुळांची वाढ चांगली होते. फुटवेही जोमाने फुटत आहेत. परिणामी, पिकाची घनता वाढून उत्पादनक्षमता सुधारण्यास मदत होत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये यंदाच्या रब्बी हंगामाबाबत शेतकऱ्यांमध्ये आशा आहे.
थंडीमुळे गहू पिकात कणसांची संख्या वाढली आहे. दाणेही मोठे होत असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यंदा पाऊस कमी पडला, तरी थंडीच्या जोरामुळे पीक उशिरा का होईना, चांगले उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही गहू पिकाची पाहणी करून उत्पादन २०-२५ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली.
गव्हाला सध्या बाजारपेठेत प्रतिक्विंटलला सरासरी तीन ते साडेतीन हजार भाव मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा चांगला आहे. यंदा कमी उत्पादनाच्या भीतीमुळे बाजारात भाव चांगले राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल.

...........
काेट
.........

यंदा थंडी खूप आहे. शेतात गहू चांगला बहरला आहे. पाने हिरवीगार आणि कणसे भरदार दिसत आहेत. त्यामुळे यंदा प्रतिएकरात १५ ते २० क्विंटल उत्पादन मिळेल, असे वाटते. बाजारातही गव्हाला भाव आहे. त्यामुळे यंदा गहू शेती फायद्याची ठरेल, अशी आशा आहे.

- अमरसिंह जगदाळे,
शेतकरी, मसूर
...............


B02495,
B02496

मसूर : थंडीमुळे शिवारात डोलणारे हिरवेगार गव्हाचे पीक.


अमरसिंह जगदाळे
.............................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com