esakal | कोरोना रुग्णांचे आशीर्वाद हीच दिवाळी भेट!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_Doctor

डॉ. भताडे गेल्या दीड वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्य करत आहे. आज त्या कोरोनाची चाचणी करणार होत्या. कारण चाचणी जर निगेटिव्ह आली तर लातूरला गावी जायचे आहे.

कोरोना रुग्णांचे आशीर्वाद हीच दिवाळी भेट!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : दिवाळीच्या दिवशीही प्रथमच रुग्णांच्या सेवेत आहे. काही दिवसांपूर्वी कोविड वॉर्डमध्ये होते. जुलैच्या तुलनेत आता रुग्णसंख्या कमी झाली असून, आनंदाने घरी परतताना रुग्णांनी दिलेले आशीर्वाद हीच खरी दिवाळी भेट आहे, अशी प्रतिक्रिया ससून सर्वोपचार रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रागिणी भताडे यांनी व्यक्त केली. 

'कोसळलेल्या आभाळावर पाय देऊन उभे रहा, महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे!'

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेली कित्येक महिने युद्धजन्य परिस्थितीत कार्य करणाऱ्या ससून रुग्णालयाला भेट दिली. आज संपूर्ण परिसर काहीसा शांतच जाणवत होता. बाह्यरुग्ण विभाग बंद असल्यामुळे रुग्णांची वर्दळही कमी दिसत होती. मात्र वॉर्ड क्रमांक 70 समोरील आकाश कंदील दिवाळीची आठवण करून देत होता. कोरोनाचा प्रभाव ससूनच्या रोजच्या कार्यपद्धतीवर झाल्याचे स्पष्ट जाणवत होते. शारीरिक अंतर राखण्यासाठी उभे केलेले अडथळे, सूचना फलक आणि लांब अंतरावर थांबणारे रुग्ण कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दिवाळीचे वेगळेपण दर्शवीत होते. 

मंदिर उघडलं, पण कार्तिकी वारीचं काय? सरकारच्या निर्णयाकडे लागले आळंदीकरांचे डोळे​

डॉ. भताडे गेल्या दीड वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्य करत आहे. आज त्या कोरोनाची चाचणी करणार होत्या. कारण चाचणी जर निगेटिव्ह आली तर लातूरला गावी जायचे आहे. गेली कित्येक दिवस त्या कोरोना रुग्णांच्या सेवेत आहे. आजची त्यांची चाचणी जर निगेटिव्ह आली तर त्या घरी परततील. कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या दिलासादायक असल्याचे डॉ. भताडे म्हणाल्या. 

जुलैच्या तुलनेत आता कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. खऱ्या अर्थाने या दिवाळीची हीच विशेषतः म्हणावी लागेल. इथे बरेच रुग्ण घरी परतताना कागदपत्रे घेऊन येतात. दिवाळीला घरी जाताना त्यांनी दिलेले आशिर्वाद आणि सदिच्छा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. 
- डॉ. रागिणी भताडे, निवासी वैद्यकीय अधिकारी, ससून सर्वोपचार रुग्णालय.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)