Pune News : ग्रामस्थांच्या मदतीने ते पती पत्नी गहिवरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

With help of villagers husband wife survived climbing sinhgad fort pune

Pune News : ग्रामस्थांच्या मदतीने ते पती पत्नी गहिवरले

खडकवासला : सिंहगडावर चढताना महिलेचा पाय फ्रक्चर झाला. त्यांना चालता हि येईना. वन विभागाचे सुरक्षा रक्षक व आतकरवाडीतील तरुण कार्यकर्त्यांनी त्यांना स्ट्रेचरवरून पायथ्याशी सुखरूप आणले. सकाळी सकाळी ग्रामस्थांनी केलेल्या मदतीने महिला आणि तिचे कुटुंब गहिवरले.

पाय फ्रक्चर महिला आपले पती, यांच्या सोबत गडावर चालण्याच्या व्यायामासाठी गडावर येतात. आज पहाटे त्या नेहमीप्रमाणे पती, मित्र परिवारा सोबत आल्या होत्या. मध्यावर पोचल्यावर त्यांचा पाय दगडावरून घसरला.

पाय फॅक्चर झाला. त्यांना उभे राहून चलता येईना. इतरांनी त्यांना धीर दिला. पायवाट फारशी रुंद नाही. अनेक वळणे, उतार, खोलगट पायवाट अशी आहे. असे असताना आता पायथ्याला कसे जायचे. हा प्रश्न त्यांच्या समोर होता.

त्यांना मदत केली. ती पायवाटेला असलेल्या लिंबू सरबत विकणारे ग्रामस्थांनी हि माहिती पायथ्याशी असलेल्या आतकरवाडीमध्ये रंगनाथ पढेर व किसन ऊर्फ दादा पढेर यांना दिली. त्यांनी ती माहिती वनरक्षक बाळासाहेब जीवडे वन विभागाला दिली. त्याचवेळी तेथून चालण्याच्या व्यायामासाठी जाणारे एका वरिष्ठ अधिकर्याने ती माहिती देखील सरकारी यंत्रणेला कळविली होती. वन सुरक्षारक्षक निलेश सांगळे यास स्ट्रेचर घेऊन पाठवल.

त्यांनी आतकरवाडीतील जय भवानी मित्र मंडळाचे कार्यकर्ते माजी उपसरपंच किसन ऊर्फ दादा पढेर, रंगनाथ पढेर यांच्या सह महेश सांबरे, योगेश सांगळे, सचिन भोंडेकर, सचिन पढेर, निलेश सांगळे, निखील रांजणे, करण मिसाळ कैलास सांगळे, ओंकार पन्हाळकर, पोपट भोंडेकर, अमोल पवार, उमेश सुपेकर हे सगळे मदतीला धावले. त्यांना स्ट्रेचरवरून पायथ्याशी सुखरूप आणले.

प्रत्यक्षात पाहायला गेलं तर या पायवाटेला एकटे सहज चालणे अवघड आहे. संबंधित रुग्णाला स्ट्रेचर वरून खाली आणणे मोठे जिकरीचे काम होते. यात स्थानिक नागरिकांनी त्यांना पायथ्याला आणलं आणि त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी त्या रवाना झाल्या. महिला व त्यांचे पती यांनी सर्व कार्यकर्ते यांचे कौतुक करताना त्यांना गहिवरून आले होते.

माझ्या पत्नीला पायथ्याला आणण्यात वन विभाग व स्थानिकांनी आम्हाला मोलाची मदत केली. याबद्दल त्या तरुण कार्यकर्त्यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे आहे. असे त्या महिलेच्या पतीने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.

टॅग्स :Pune Newswife and husband