
इंदापूर येथे म्हशीच्या तीन रेडकूवर झालेला हल्ला लांडग्याचा
इंदापूर - मंगळवार दि. ३१ मे रोजी रात्री इंदापूर शहर शेंडे मळा परिसरातील प्रवीण चंद्रकांत शेंडे यांच्या म्हशींच्या तीन रेडकु वर अज्ञात प्राण्याने हल्ला केला.या हल्ल्यात दोन रेडकू मरण पावले तर एक रेडकू गंभीर जखमी आहे. येथील कुत्रा देखील मृत्युमुखी पडला आहे. यामध्ये शेंडे यांचे ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून याचा पंचनामा देखील वन खात्याने केला आहे.
दरम्यान हा हल्ला बिबट्याने केला असल्याच्या चर्चेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र हा हल्ला बिबट्याचा नसून लांडगा किंवा तत्सम प्राण्याचा असल्याचा खुलासा वन परिक्षेत्र अधिकारी अजित सुर्यवंशी यांनी केल्याने शहरातील भीती कमी झाली आहे. दरम्यान घटनास्थळी सीसीटिव्ही कॅमेरे बसवूनवनअधिकारी काही दिवस करडी नजर ठेवणार असल्याने परिसरात सर्वांना दिलासा मिळाला आहे.
जनावरांवर झालेल्या हल्लाची पद्धत पाहता हा हल्ला बिबट्याने केला नसून, लांडगा किंवा तत्सम प्राण्याने केला असल्याच्या निष्कर्षावर आम्ही पोहोचलो आहे. परिसराची पाहणी केली असता बिबट्याच्या असण्या संदर्भात कोणतेही पुरावे आम्हाला अद्याप सापडले नाहीत. त्यामुळे शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये.आम्ही घटनेचा पंचनामा केला असून शासकीय नियमा नुसार शेंडे यांना नुकसान भरपाई मिळेल असे अजित सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
जनावरांवर झालेल्या हल्ल्याची परिसरातील नागरिकांमध्ये दहशत असून वनअधिकाऱ्यांनी हल्लेखोर प्राण्याचा शोध घेवून त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. दिवसभर सोशल मीडियावर रेडकू हल्ल्याचे फोटो फिरल्याने नागरिक घरा बाहेर पडण्यास देखील घाबरत असल्याची प्रति क्रिया पीडित शेतकरी प्रवीण शेंडे यांनी व्यक्त केली.
Web Title: Wolf Attacked Three Buffalo Calf In Indapur City
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..