

शिक्रापूर : येथील पाबळ चौकातील भारतीय स्टेट बँकेसमोरील भाजीविक्रेत्या असलेल्या नंदा रामदास जगताप (वय ६०, रा. वाबळेवाडी- शिक्रापूर, ता. शिरूर) या भाजी विक्री करत असताना त्यांचा एका महिलेशी वाद होत असतानाच त्यांना भोवळ आली. त्यांना तातडीने जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.