Minor Girl Targeted; Accused Allegedly Followed and Threatened
Sakal
सुनील जगताप
थेऊर : महिला मुकादमाने मजुर देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरुन आचा-याने तिच्या मुलीचा विनयभंग करत महिलेस अश्लील शिवीगाळ व स्त्री मनास लज्जा उत्पन्न होणारे कृत्य केले आहे.पिडीतेने आचा-याविरोधांत तक्रार दिली आहे.याप्रकरणी २८ वर्षे वयाच्या केटरर्स मुकादम महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून निलेश म्हात्रे (रा.लोणी काळभोर,ता.हवेली) याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.