पुणे : कोथरूडमध्ये वाहतूक कोंडीमुळे रिक्षात जन्मले बाळ

woman gave birth to baby in auto at Kothrud Pune
woman gave birth to baby in auto at Kothrud Pune
Updated on

पुणे : शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पोटात दुखू लागले म्हणून भूगाववरून रिक्षाने पुण्यातील दवाखान्यात दाखवण्यासाठी ते कुटूंब निघाले. परंतु, वाहतूककोंडी इतकी होती की, गाडी पुढे सरकतच नव्हती. रिक्षातून उतरून एकाने वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणताही वाहनचालक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. वाहनांचे कर्णकर्कश आवाज, धूर यात अडकलेली रिक्षा आणि त्यातून बाळंतपणासाठी मुलीला घेवून निघालेली आई!

मुलीला दवाखान्यात कसे न्यावे हा प्रश्न आईला पडला. बाळ व बाळंतीण दोघेही सुखरूप राहिले पाहिजे हे आव्हान त्यांच्यापुढे होते. आईने निर्णय घेतला. रिक्षा रस्त्यापासून जराशी बाजूला केली. स्वतःचे पारंपारिक ज्ञान वापरत मुलीला धीर देत आईने मुलीचे बाळंतपण रिक्षातच केले. कोथरुडला दवाखान्यात दाखल करून बाळ व बाळंतीणीवर पुढील औषधोपचार करण्यात आले. आता दोघेही खुशाल आहेत. 

प्रा. सागर शेडगे म्हणाले की, भूगाव भागात असणारी मंगल कार्यालये, बावधन हद्दीत असणारी वींड मील सोसायटी कडून येणारी जाणारी वाहने, रस्त्यावर असेलेल्या दारूच्या दुकानाजवळ लावलेली वाहने यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या परिसरात सकाळी व संध्याकाळी विशेषतः सुट्टीच्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी होत असते. वाहतूक पोलीस व ग्रामीण पोलिसांनी या परिसरातील वाहतूक कोंडी सुटावी यादृष्टीने नियोजन करावे. 

सचिन धनकुडे- ग्रामीण भागात वाहनांची व रस्त्याची सोय नाही म्हणून रूग्णांना दवाखान्यात नेणे अडचणीचे ठरते तर शहरात वाहतूक कोंडी सोडवता येत नाही म्हणून रूग्ण दगावत असल्याचे दिसते. या दोन्ही बाबी नियोजनातील अपयशाचे दर्शक आहेत. विकसीत असूनही वंचित रहावे लागते हे दुर्दैव आहे. राज्यकर्ते , अधिकारी आणि जनतेने आत्मपरीक्षण करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com