ओतूर - उंब्रज नं. १ (ता. जुन्नर) च्या महिला ग्रामपंचायत सदस्याने चौथऱ्याच्या घडीव दगडाची चोरी केल्यामुळे त्याना ओतूर (ता. जुन्नर) येथील पोलिसांनी अटक केली आहे. सदर ग्रामपंचायत सदस्याला मा.न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक एल जी थाटे यांनी दिली.