
पुणे : सात महिन्यांच्या बाळाच्या अपहरणप्रकरणी बिहारमधून पुण्यात दाखल झालेल्या महिलेवर पुणे स्थानकावर कारवाई करण्यात आली. पुणे रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी संबंधित महिलेसह तिच्यासोबतच्या एका व्यक्तीला पुढील कार्यवाहीसाठी हाजीपूर लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.