esakal | रोटी घाटातील अपघातात महिला ठार, पती- मुलगा जखमी 
sakal

बोलून बातमी शोधा

रोटी घाटातील अपघातात महिला ठार, पती- मुलगा जखमी 

या अपघातात मोनाली सूरज जाधव (वय २५) यांचा मृत्यू झाला; तर सूरज प्रकाश जाधव (वय २७) व प्रतीक सूरज जाधव (वय ५, सर्व रा. माळेगाव, ता. बारामती) हे जखमी झाले आहेत. 

रोटी घाटातील अपघातात महिला ठार, पती- मुलगा जखमी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पाटस (पुणे) - पाटस-बारामती राज्यमार्गावरील रोटी घाटाच्या पहिल्या वळणावर आज (ता. २३) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ट्रक व दुचाकीचा विचित्र अपघात झाला. यात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांचा पती व मुलगा जखमी झाला आहे. 

याबाबत पाटस पोलिस चौकीचे हवालदार बाळासाहेब पानसरे यांनी माहिती दिली की, या अपघातात मोनाली सूरज जाधव (वय २५) यांचा मृत्यू झाला; तर सूरज प्रकाश जाधव (वय २७) व प्रतीक सूरज जाधव (वय ५, सर्व रा. माळेगाव, ता. बारामती) हे जखमी झाले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ते बुधवारी दुपारी पाटस- बारामती राज्यमार्गाने स्कूटी या दुचाकीवरून बारामतीला चालले होते. सूरज हे दुचाकी चालवत होते. रोटी घाटाच्या पहिल्या वळणावर ते ट्रकच्या पुढे जात होते. त्यावेळी घाटाच्या वळणावर ट्रकचा स्कूटीला धक्का लागला. या वेळी काही क्षणात स्कुटी बाजूला पडली. या अपघातात मोनाली या थेट ट्रकच्या चाकाखाली सापडल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, सूरज व प्रतीक हे रस्त्यावर पडल्याने जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालकाने पळ काढला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या अपघाताची माहिती मिळताच पाटस पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे, सहायक फौजदार सागर चव्हाण, हवालदार बाळासाहेब पानसरे, पोलिस नाईक सुधीर काळे, समीर भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी मोनाली यांचा ट्रकच्या चाकाखाली मृतदेह तसाच पडला होता. तर, जखमी सूरज व प्रतीक हे जखमी अवस्थेत होते. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी पाटस येथील खासगी दवाखान्यात पाठवून दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप