
शिरूर : ग्रामपंचायतीच्या केलेल्या कामाबरोबरच ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडीच्या केलेल्या कामाच्या बीलाचा धनादेश काढण्यासाठीचा मोबदला म्हणून या कामांच्या ठेकेदाराकडून थेट ग्रामपंचायत कार्यालयातच साठ हजार रूपयांची लाच स्विकारताना भांबर्डे (ता. शिरूर) च्या ग्रामपंचायत अधिकारी निर्मला कैलास भुजबळ यांना लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले.