सकारात्मक इच्छाशक्तीच्या जोरावर महिला पोलिसाने केली कोरोनोवर मात

सुदाम बिडकर
Saturday, 30 May 2020

- नऊच दिवसात सकारात्मक इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी कोरोनोवर मात केली.

पारगाव : आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील नवनाथ कोंडीबा भोर (रेल्वे पोलिस), पत्नी शिल्पा नवनाथ भोर (नवी मुंबई पोलिस) शिल्पाची बहीण सिमा प्रथमेश थोरात (मुबंई पोलिस) एकाच कुटुंबातील तीघे जण कोरोनो योध्दे म्हणून कर्तव्य बजावत असताना यापैकी शिल्पा भोर यांना कोरोनो विषाणूचा संसर्ग झाला. परंतु, नऊच दिवसात सकारात्मक इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी कोरोनोवर मात करुन सुखरूप घरी परतल्या. त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर पुन्हा त्या नव्या जोमाने सेवेत रूजू होणार आहेत. त्यांच्या या कार्याला सलाम.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिल्पा भोर यांचे माहेर हे आंबेगाव तालुक्यातील नांदुर टाकेवाडी त्यांचे वडील मारुती कोंडाजी वायाळ यांनी गावचे सरपंचपद भूषविलेले आहे. शिल्पा यांचे पती नवनाथ भोर हे रेल्वे पोलिस मध्ये वर्धा या ठिकाणी कर्तव्य बजावत आहे, शिल्पाची धाकटी बहीण सीमा थोरात ( गाव लौकी ता. आंबेगाव) याही मुंबंई पोलिस मध्ये कर्तव्य बजावत आहे. राज्यात कोरोनो विषाणुच्या संसर्ग झपाट्याने वाढत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य कर्मचार्यांबरोबर पोलिस दलही अहोरात्र झटत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाऊनमध्ये रेल्वेसेवा जरी बंद असली तरी वैद्यकीय साहीत्य तसेच जीवानावश्यक वस्तुंच्या वहातुकीसाठी रेल्वेच्या मालगाड्या सुरु असल्याने नवनाथ भोर वर्धा येथे कर्तव्यावर आहे. शिल्पा पनवेल पोलिस ठाण्यात तर सिमा गोवंडी पोलिस ठाण्यामध्ये कर्तव्य बजावत आहे. कोरोनोमुळे आपल्यापासुन आपल्या कुटुंबाला तसेच मुलांना त्रास होऊ नये म्हणून दोघी बहिणींनी मुलांना भाऊ सचिन वायाळ यांच्याकडे अगोदरच गावी पाठवले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दोघी बहीणी एकत्र पनवेल येथे राहत होत्या.शिल्पा या कर्तव्य बजावत असताना दहा दिवसापुर्वी त्यांची तब्बेत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले त्यांची कोरोनो चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हा धक्कादायक रिपोर्ट आला. पतीही लांब वर्ध्याला सोबत फक्त बहीण तरीही त्या न डगमगता कोरोनाला सामोऱ्या गेल्या. नऊ दिवसातच त्या कोरोनोला हरवुन सुखरुप घरी आल्या आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकत्र राहत असल्याने बहीण सीमा यांची कोरोनो चाचणी करण्यात आली ती निगेटीव्ह आली आहे. दोघी बहिणी क्वारंटाईन असून, हा कालवाधी संपल्यानंतर त्या पुन्हा सेवेत रुजु होणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman Police Cured from Coronavirus in Pargaon Pune