धक्कादायक! पुण्यात केईएम हॉस्पिटलच्या टेरेसवरुन उडी मारुन महिलेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

वानवडी येथे राहणाऱ्या 36 वर्षीय महिलेच्या 13 वर्षाच्या मुलाला मुत्रपिंड व मधुमेहाचा त्रास सुरु होता. त्याच्यावर केईएम रुग्णलयात 4 वर्षापासून नियमित उपचार सुरु होते. त्यामुळे त्याला उपचारासाठी केईएम रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर पाचव्या मजल्यावरील कक्षात उपचार सुरु होते.

पुणे : केईएम रुग्णलयाच्या टेरेसवरुन एका महिलेने उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी समर्थ पोलिस तपास करीत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

वानवडी येथे राहणाऱ्या 36 वर्षीय महिलेच्या 13 वर्षाच्या मुलाला मुत्रपिंड व मधुमेहाचा त्रास सुरु होता. त्याच्यावर केईएम रुग्णलयात 4 वर्षापासून नियमित उपचार सुरु होते. त्यामुळे त्याला उपचारासाठी केईएम रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर पाचव्या मजल्यावरील कक्षात उपचार सुरु होते. रविवारी रात्री मुलाने त्याचे डोके दुखत असल्याबद्दल आईला सांगितले होते. त्यानंतर मुलाची आजी याबाबत डॉक्टरांना सांगण्यासाठी गेली. दरम्यान, पहाटे साडे चार वाजता महिलेने पाचव्या मजल्यावरुन खाली उडी मारली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तिचा मृत्यु झाला. 

चला वारीला : ना धावला अश्व उभा, रुसला लिंबाचा चांदोबा

दरम्यान, महिलेच्या आत्महत्या करण्याचे कारण समजु शकले नाही, मात्र काही दिवसांपूर्वीच महिलेच्या पतीचे कर्करोगाने निधन झाले होते. त्यापाठोपाठ मूलगा देखील आजारी पडला होता.

यंदा राज्य मंडळाचा अभ्यासक्रम होणार कमी - दिनकर पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A woman Suicide by jumping from the terrace of KEM Hospital pune