crime
ESakal
पुणे - सुपर मार्केटमध्ये दीड लाखाच्या नोकरीचे आमिष दाखवून एका २८ वर्षीय महिलेला पोर्तुगालमध्ये नेऊन वेश्या व्यवसायासाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अकरा लाख रुपये उकळून एजंटांनी तिची विक्री केली. आरोपींच्या तावडीतून धाडसाने सुटका करून भारतात परतलेल्या या महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पुण्यातील एजंटांसह पोर्तुगालमधील आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.