
पुणे - बाणेर-पाषाण लिंक रस्ता परिसरातील एका महिलेच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा कॉल आला. ‘हॅलो...मुंबईच्या गुन्हे शाखेकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात तुमच्या मोबाईल क्रमांकाचा वापर झाला आहे. तुमच्या सर्व बॅंक खात्याची पडताळणी करावी लागेल,’ असे सांगितले.