पिंपरीत खंडणी घेताना महिलेला अटक 

संदीप घिसे 
रविवार, 21 एप्रिल 2019

सोनिया उद्देश मेहरा (वय २२, रा. कळस हौसिंग सोसायटी,कळस रोड, विश्रांतवाडी, पुणे) असे पोलिसांनी अटक केलेल्या खंडणीखोर महिलेचे नाव आहे. प्रज्ञा सोमनाथ बोराटे (वय ३० रा. गणपती मंदिराजवळ बोराटे वस्ती मोशी पुणे.सध्या रा. घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पिंपरी (पुणे) : फेसबुकवरून ओळख झालेल्या मैत्रिणीने बलात्काराची फिर्याद देण्याची धमकी देत तरुणांकडून वारंवार खंडणी उकळली. या प्रकरणी त्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना चिखली येथे घडली. 

सोनिया उद्देश मेहरा (वय २२, रा. कळस हौसिंग सोसायटी,कळस रोड, विश्रांतवाडी, पुणे) असे पोलिसांनी अटक केलेल्या खंडणीखोर महिलेचे नाव आहे. प्रज्ञा सोमनाथ बोराटे (वय ३० रा. गणपती मंदिराजवळ बोराटे वस्ती मोशी पुणे.सध्या रा. घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार,  जून २०१८ मध्ये फिर्यादी प्रज्ञा यांचे पती सोमनाथ यांची आरोपी सोनिया हिच्याशी फेसबुकवरून ओळख झाली. त्यानंतर सोनिया हिने सोमनाथ  यांच्याशी जवळीक साधून प्रेमाचे नाटक केले. 

त्यानंतर प्रज्ञा आणि सोमनाथ यांना 'तुमच्या विरोधात बलात्काराची फिर्याद देते, तुमची समाजात बदनामी करते,' अशी भीती दाखवून वेळोवेळी तीन ते चार लाख रुपये, दुचाकी सोन्याची चेन, मोबाइल घेतला. 

तसेच सोमनाथ यांच्याकडे पुन्हा दहा हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून प्रज्ञा यांनी अखेर चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी  सापळा रचून शनिवारी सोनिया हिला दहा हजार रुपयांची खंडणी घेताना घरकुल चिखली येथून अटक केली.

Web Title: women arrested for take ransom in Pimpri

टॅग्स