esakal | घरात घुसून टोळक्‍याकडून कोंढवे धावडेत महिलेस जबर मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

घरात घुसून टोळक्‍याकडून कोंढवे धावडेत महिलेस जबर मारहाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - रस्त्याने जाताना दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्याच्या रागातुन टोळक्‍याने तरुणाच्या घरात घुसून तरुणाच्या आईला जबर मारहाण केली. हि घटना मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता कोंढवे धावडे येथे घडली. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी पाच जणांना अटक केली. (Women Beating by Gang Crime Pune)

धीरज गणेश धावडे, भूषण तानाजी धावडे, कुणाल किरण धावडे, संकेत तानाजी धावडे, चिराग भगवान धावडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वैशाली धावडे (वय 55 ) उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगा अभिजीत हा मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उत्तमनगर येथील सुदर्शन मित्र मंडळासमारुन येत होता. त्यावेळी फिर्यादीच्या शेजारी राहणाऱ्या धीरज गावडे याने त्याच्या दुचाकीवरुन पाठीमागून येऊन अभिजीतला कट मारला. घडलेला प्रकार अभिजीतने घरी आल्यानंतर फिर्यादीस सांगितला. हा प्रकार धीरजच्या वडीलांना सांगण्यासाठी फिर्यादीने त्यांच्या ओळखीचे धनंजय मोकाशी यास सांगितले. त्यानंतर रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीला त्यांच्या घराबाहेर शिवीगाळ केल्याचे ऐकू आले.

हेही वाचा: ‘जिसका माल, उसका हमाल’च्या अंमलबजावणीस देशात प्रारंभ

त्यानंतर फिर्यादी व त्यांची मुलगी बाहेरच्या खोलीत आल्या, तेव्हा फिर्यादीच्या घराचा लोखंडी दरवाजा तोडून आरोपी घरामध्ये आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी हातात कोयता घेतलल्या धीरज गावडे व हातात हॉकी स्टिक घेतलेल्या भुषण गावडे या दोघांनी फिर्यादीस मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी झाल्या. तर त्यांच्या साथीदारांनी फिर्यादीस शिवीगाळ केली. फिर्यादींनी त्यांचे पती व मुलगा अभिजीत यांना मदतीस बोलाविले. तेव्हा आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना धमकी दिली. तसेच फिर्यादींनी त्यांच्या मुलाला पोलिसांना बोलाविण्यास सांगितल्यानंतर आरोपी तेथून निघून गेले. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक पी.एम.वाघमारे तपास करीत आहेत.

loading image