काशीळ नागठाणे गटातून सुसंस्कृत उमेदवार अजित साळुंखे यांचा विजय निश्चित

काशीळ नागठाणे गटातून सुसंस्कृत उमेदवार अजित साळुंखे यांचा विजय निश्चित

Published on

महिलांची शक्ती साळुंखेंच्या पाठीशी ः चित्रा वाघ

काशीळ, ता. ४ : ज्या उमेदवाराच्या पाठीशी महिला शक्ती उभी राहते, त्याचा विजय
असतो. महिला ही केवळ घराची लक्ष्मी नसून ती एक निर्णायक ‘व्होट बँक’ आहे. सातारा तालुक्यात खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार मनोज घोरपडे यांनी विकासाची गंगा आणली आहे. त्यामुळे नागठाणे गटातील भाजपचे उमेदवार अजित साळुंखे यांना साथ द्या, असे आवाहन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.
काशीळ येथे नागठाणे जिल्हा परिषद गटाचे भाजपचे उमेदवार अजित साळुंखे आणि अतित पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुषमा जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित ‘मतदार संवाद’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांवर निशाणा साधताना आमदार वाघ यांनी आपल्या भाषणात आमदार मनोज घोरपडे यांच्या कार्याचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, ‘‘माजी आमदारांना २५ वर्षांत जे जमले नाही, ते आमदार घोरपडे यांनी अवघ्या एका वर्षात ७०० कोटींहून अधिक निधी आणून करून दाखवले आहे. अशा कार्यक्षम नेतृत्वाचे हात बळकट करण्यासाठी आदर्श शिक्षक अजित साळुंखे आणि सुषमा जाधव यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा.’’ सखी मंचाच्या अध्यक्षा समता घोरपडे यांचेही भाषण झाले. कऱ्हाड उत्तरमधील भाजप उमेदवारांच्या विजयात महिलांचा वाटा सिंहाचा असेल, असे त्यांनी नमूद केले. अजिंक्यतारा कारखान्याचे संचालक जयवंत कुंभार यांनी कार्यकर्त्यांना विजयासाठी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला राजाराम जाधव, माजी सरपंच प्रकाश जाधव, नितीन जाधव, रघुनाथ तळेकर, प्रवीण जाधव, गणेश साळुंखे, गणेश जाधव, पांडुरंग कुंभार, अनिल काशीद, सचिन पवार, सुनील घाडगे, महेश जाधव, ग्रामस्थ उपस्थित होते. सचिन पवार यांनी आभार मानले.

चौकट...
मतदारांत उत्साह
------------
नागठाणे गटात अजित साळुंखे यांच्या रूपाने एक सुसंस्कृत आणि अभ्यासू चेहरा आदर्श गृहिणी सुषमा जाधव व राजेंद्र ढाणे हे भाजपच्या माध्यमातून मैदानात असल्याने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

26B01630
काशीळ : येथे मतदार संवाद कार्यक्रमात चित्रा वाघ. त्या वेळी अजित साळुंखे, जयवंत कुंभार, राजाराम जाधव, प्रकाश जाधव आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com