
पुण्यात ३१ वर्षीय महिलेनं ६ वर्षांच्या चिमुकल्यासह इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडलीय. बुधवारी सायंकाळी आंबेगाव बुद्रुक परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आंबेगाव कल्पक सोसायटीत महिला राहत होती. नणंदेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मयुरी देशमुख असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे.