Parbhani : पुण्याहून परभणीला निघालेल्या बसमध्ये प्रसूती, बाळाला खिडकीतून फेकलं; १९ वर्षीय तरुणीसह तरुणाला अटक, काय घडलं?

Newborn Baby Boy Discarded : पुण्याहून परभणीला निघालेल्या खासगी बसमध्येच बाळाला तरुणीनं जन्म दिला. यानंतर तिच्यासह पार्टनरने अर्भकाला धावत्या बसमधून बाहेर फेकलं. यात अर्भकाचा जागीच मृत्यू झाला.
newborn baby thrown from bus Maharashtra
newborn baby thrown from bus MaharashtraEsakal
Updated on

पुण्याहून परभणीला जाणाऱ्या बसमध्ये एका १९ वर्षीय तरुणीनं बाळाला जन्म दिला. तिच्यासोबत तिचा २१ वर्षीय पार्टनरही बसमध्ये होता. बसमध्येच जन्म दिल्यानंतर नवजात अर्भकाला दोघांनी धावत्या बसमधून बाहेर फेकलं. यात अर्भकाचा जागीच मृत्यू झाला. चालकाला बसमधून कुणीतरी काही फेकल्याचं लक्षात येताच बस थांबवण्यात आली. एका महिला सहप्रवाशाने हा सगळा प्रकार सांगताच तरुण-तरुणीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com