महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी -मनिषा लेंगरे
TSG26B02011
शेवाळेवस्ती (ता. पंढरपूर) : महिला दिनानिमित्त येथे आयोजित महिला मेळाव्यास उपस्थित महिला.
---
तिसंगीत महिला मेळावा उत्साहात
तिसंगी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेवाळेवस्ती येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. यावेळी अंगणवाडी सेविका मनीषा लेंगरे यानी महिलांच्या सामाजिक, आर्थिक, आरोग्य विषयक जनजागृती, महिलांसाठी असलेल्या विविध योजनांसंदर्भात माहिती दिली. यावेळी तिसंगी ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच सुरवंता हेगडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी शेळके, शोभा बिराजदार, सिंधू कारंडे, गोकुळा शेवाळे, मनीषा शेवाळे, उमा चंदनशिवे, कुसुम आहेरकर, गीता डुबे, मुख्याध्यापक बापू कारंडे आदींसह परिसरातील महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमामध्ये महिलांच्या लिंबू- चमचा व संगीतखुर्ची स्पर्धा घेण्यात आल्या. विजयी स्पर्धकांना मुख्याध्यापक कारंडे यांच्याकडून बक्षीस देण्यात आले. सागर लोंढे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

