‘एनआरसी’ विरोधात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए ) व राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी कुलजमाते तंजीम संघटना व कोंढव्यातील विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने महिलांचे धरणे आंदोलन गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे.

हडपसर - नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए ) व राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी कुलजमाते तंजीम संघटना व कोंढव्यातील विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने महिलांचे धरणे आंदोलन गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हा कायदा देशाच्या प्रत्येक नागरिकांविरुद्ध आहे. संविधानविरुद्ध आहे. देशातील समता, स्वातंत्र्य व बंधुता नष्ट करणारा आहे. तेव्हा हा कायदा तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी या महिलांकडून केली जात असल्याची माहिती आंदोलक डॉ. अलसव्हा यांनी दिली.

या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पाठिंबा दिला असून, बुधवारी आमदार चेतन तुपे, नगरसेविका परवीन हाजी फिरोज, नंदा लोणकर यांनी आंदोलनकर्त्या महिलांची भेट घेतली.बहुजनांना हटवून मनुवादी व्यवस्था निर्माण करण्याचा घाट भाजपने आखला आहे. कायदा रद्द न झाल्यास देशव्यापी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती हाजी फिरोज यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Movement Against CAA and NRC Law in kondhwa