Pune Police Damini squad : महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरसावल्या दामिनी, मुलींनो अन्याय सहन करू नका...

सदाशिव पेठेत एका तरुणीवर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यानंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत खबरदारी घेण्याचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत.
Pune Police
Pune Policesakal
Updated on

Pune Police Damini squad - स्थळ एच.व्ही. देसाई महाविद्यालय...मुलां-मुलींनी खचाखच भरलेला हॉल. ‘‘विद्यार्थ्यांनो, जीवनाचा निखळ आनंद घ्या. परंतु क्षणिक सुखासाठी भरकटत जाऊ नका. आता केवळ मौजमजा कराल तर आयुष्यभर काबाडकष्टच करावे लागतील. जीवनात उत्तम आदर्श ठेवून उज्ज्वल भविष्य घडवा. मुलींवर अन्यायाच्या घटना होणे भूषणावह नाही.

मुलींनो अन्याय सहन करू नका. दामिनी पथकातील महिला पोलिस कर्मचारी ह्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करीत होत्या. दररोज शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे समुपदेशन, तर दुसरीकडे मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना शिक्षा, अशा प्रकारे दामिनी पथकांकडून कारवाई केली जात आहे. ( Pune Police Damini squad)

Pune Police
Mumbai : दुसऱ्या मजल्यावरून मांजराला खाली फेकले, मांजराचा जागीच मृत्यू..

सदाशिव पेठेत एका तरुणीवर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यानंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत खबरदारी घेण्याचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत.

तसेच, गुन्हे शाखेकडून दामिनी पथकांची संख्या वाढवली आहे. शाळा-महाविद्यालये भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी त्या परिसरात दामिनी पथकाकडून गस्त घालण्यात येत आहे.

Pune Police
Pune Crime : भांडणं सोडवण्यासाठी मधे आला म्हणून सराईत गुन्हेगारांकडून तरुणावर जिवघेणा हल्ला

शाळा-महाविद्यालयात तक्रार पेटी बसविण्यात येत आहे. जेणेकरून मुलींना त्यांची तक्रार करता येईल. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

या दामिनी पथक क्रमांक-एकमध्ये पोलिस हवालदार रजिया सय्यद, पोलिस नाईक उज्ज्वला बनकर, वैशाली निमगिरे, शारदा उमाळे, अश्विनी पवार, श्वेता वलेकर, गोपी भालेराव, प्रिया माने, सोनाली बिराजदार, सोनाली हिंगे यांच्यासह अलंकार पोलिस ठाण्यातील एस.व्ही. कोळी, माधुरी कुंभार, विश्रामबाग पोलिस ठाण्यातील सूर्यभान घोडके आणि सोनाली धुमाळ यांचा समावेश होता.

दामिनी पथक शाळा-महाविद्यालयांत जाऊन मुलां-मुलींचे समुपदेशन केले जात आहे. त्यांच्याशी संवाद साधला जातो. तसेच, या परिसरात दिवसातून दोन-तीन वेळा गस्त घातली जाते. मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंचा समाचारही घेतला जात आहे. त्यामुळे मुलींच्या छेडछाडीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होत आहे.

- रजिया सय्यद, पोलिस हवालदार, दामिनी पथक

Pune Police
Mumbai : कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याची चाळण; दक्षता विभाग शोधणार खड्ड्यांची कारणे...

प्रत्येक दामिनी पथकात गुन्हे शाखेच्या भरोसा सेलमधील दोन महिला पोलिस आणि स्थानिक पोलिस ठाण्यातील एका महिला कर्मचाऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. शहरात अशी एकूण ४० दामिनी पथके नेमण्यात आली आहेत.

गुन्हे शाखा आणि संबंधित परिमंडळातील पोलिस उपायुक्तांकडून दामिनी पथकाच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

- अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा.

काही रोडरोमिओ महाविद्यालयाच्या बाहेरील परिसरात फिरत असतात. परंतु महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी गस्त वाढवली आहे. त्यामुळे महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली आहे.

- एक महाविद्यालयीन तरुणी.

पोलिस हेल्पलाइन क्रमांक-

महिलांसाठी १०९१

लहान मुलां-मुलींसाठी १०९८

सर्वांसाठी ११२

ज्येष्ठ नागरिक, भरोसा सेल १०९०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.