

Pune Metro Promotes Women Leadership in Station Operations
sakal
पुणे : रविवारची सुट्टी असल्याने प्रवाशांची तशी लगबग कमी होती. सकाळी साडेसातला माझी ड्यूटी सुरू होणार असल्याने मी वेळेपूर्वीच स्थानकावर दाखल झाले. मेट्रोच्या केबिनमध्ये बसले आणि साडेसात वाजताच मेट्रो वनाज ते रामवाडी मार्गावर धावू लागली. स्थानकावर आज सगळीकडेच महिलांचा वावर होता. हे चित्र पाहून मीदेखील मनोमन आनंदले. मेट्रो चालविणे हे दररोजचेच काम, पण आज मात्र महिला असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगत होती मेट्रोची ट्रेन ऑपरेटर प्राजक्ता ठाकरे.