
Pune ZP Election
Sakal
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या १३ पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये १३ पैकी ७ पंचायत समितीच्या कारभाराची सूत्रे महिलांच्या हाती आली आहेत.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. सभापती पदासाठी ही सोडत अडीच वर्षे कालावधीसाठी असणार आहे, अशी माहिती यावेळी जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ. चारुशीला देशमुख-मोहिते यांनी दिली.