शिरूर - चालक लंघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला मोटार उभी करून थांबला असताना दूचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्या गळ्याला चाकू लावून मोटारीतील इतरांना धमकावले व कोयत्याचा धाक दाखवून मोटारीतील महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडून घेत पलायन केले. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव गणपती जवळ आज पहाटे हा प्रकार घडला.