ग्रामीण पोलिस दलातील महिलांना आता आठ तासांची 'ड्युटी'

पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या आदेशाचा साडे तीनशे महिला पोलिसांना होणार फायदा
police
policesakal

पुणे : महिला पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस दलातील सेवा करण्याबरोबरच त्यांना त्यांची कौटुंबिक जबाबदारीही चांगल्या पद्धतीने पार पाडता यावी, यासाठी ग्रामीण पोलिस दलातील महिला पोलिसांना सुट देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना आता 12 तासांऐवजी 8 तास कर्तव्य बजवावे लागणार असून साडेतीनशे महिला पोलिस कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होईल, अशी माहिती ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी दिली.

police
पाणीपुरी न विचारता का आणली? रागाच्या भरात पुण्यात पत्नीची आत्महत्त्या

पोलिस दलात कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांना सण, उत्सव, बंदोबस्त, गंभीर गुन्हे या निमित्ताने वर्षभरातून अनेकवेळा ज्यादा तास कर्तव्य बजवावे लागते. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जबाबदारीवर त्याचा परिणाम होतो, तसेच त्याचा त्यांच्या कर्तव्यावरही परिणाम होतो. याबाबत पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी पोलिस दलातील महिला अमंलदारांना येणाऱ्या अडचणींचा सहानभुतीपुर्वक विचार त्यांना 12 तासांऐवजी 8 तास कर्तव्य बजावण्यास सांगावे, असा आदेश दिला होता. त्या आदेशानुसार, ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी याबाबतच्या सुचना प्रशासनाला दिल्या.

police
बदलीच्या ठिकाणी रुजू न अधिकाऱ्यांवर होणार कारवाई - आयुष प्रसाद

पुणे ग्रामीण पोलिस दलातील महिल पोलिसांना बुधवारपासून (ता.1 ) आठ तासच कर्तव्यावर हजर रहावे लागणार आहे. डॉ. देशमुख यांनी दिलेल्या या आदेशाचे महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी जोरदार स्वागत केले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास पुरूष अमंलदारांना देखील आठ तासाचे कर्तव्य देण्याबाबत विचार सुरू असल्याचे संकेत डॉ. देशमुख यांनी दिले आहेत.

पोलिस महासंचालकांनी महिला पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांची सेवा बजावण्याबरोबरच कौटुंबिक जबाबदारीसाठीही वेळ देता यावा, यासाठी 8 तासाच्या कामाचे आदेश दिले होते. त्यानुसार आम्ही ग्रामीण पोलिस दलातील साडे तीनशे महिला पोलिसांना आठ तास कर्तव्य बजावण्याबाबतचे सुचना दिल्या आहेत.''

- डॉ.अभिनव देशमुख, पोलिस अधिक्षक, पुणे ग्रामीण पोलिस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com