पुणे : महिलांच्या सुरक्षेसाठी तरुणीने तयार केले ‘वूमन सेफ्टी सूट’

सोलापूरच्या २३ वर्षीय अंकिता रोटे या तरुणीने हे अद्ययावत ‘सेफ्टी सूट’ तयार केले आहे.
वूमन सेफ्टी सूट’
वूमन सेफ्टी सूट’Sakal
Updated on

पुणे : देशात महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रात्रीच नाही तर दिवसाही बलात्कार, छेडछाडीच्या घटना घडता आहेत. पण महिला मुलींना आता घाबरण्याची गरज नाही... 'वूमन सेफ्टी सूट’मुळे आता त्या स्वतःचे रक्षण करू शकतील. सोलापूरच्या २३ वर्षीय अंकिता रोटे या तरुणीने हे अद्ययावत ‘सेफ्टी सूट’ तयार केले आहे.

अंकिता ही सोलापुरच्या एन.बी.एन.सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेच्या अंतिम वर्षात शिकत आहे. तिने तयार केलेल्या या सेफ्टी सूटमुळे आता महिलांना सुरक्षितपणे वावरण्यास मदत मिळणार आहे. अंकिता सांगते, ‘‘अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना आपल्या या शिक्षणाचा फायदा समाजासाठी, खासकरून महिलांसाठी व्हावा अशी इच्छा होती. देशात महिला अत्याचारांच्या अनेक घटना घडतात. त्यात मी सुद्धा शिक्षणासाठी रोज लांबचा प्रवास करत महाविद्यालयाला जाते.

वूमन सेफ्टी सूट’
Pune Building Collapse: येरवडा घटनेच्या चौकशीसाठी शोध समिती

बऱ्याचदा अशी परिस्थिती निर्माण होते जिथे महिला स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम नसते. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी अशा सेफ्टी सूटची निर्मिती करण्याची कल्पना सुचली. डिप्लोमाचे शिक्षण घेतानाच यासाठी संशोधन सुरू केले. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी देखील यासाठी प्रोत्साहन दिले. हा सेफ्टी सूट साकारण्यासाठी साडे तीन वर्षांचा कालावधी लागला.’’

एखाद्या महिलेसोबत छेडछाड किंवा गैरवर्तन करण्याचा प्रयत्न झाल्यास या सेफ्टी सूटमध्ये असलेल्या सेन्सरमुळे आवाज निर्माण होल. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना देखील याबाबत समजेल आणि ते त्या महिलेच्या मदतीसाठी धावतील. तसेच सूटमधील सेन्सर मोबाईलशी कनेक्टेट असल्यामुळे त्यातून एक संदेश पोलिस व कुटुंबाला जाईल. यातील विशेष बटणमुळे गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला विजेचा हलका झटका देखील बसतो. दरम्यान हे सेफ्टी सूट परिधान करणाऱ्या महिलेला विजेचा झटका बसणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे.

‘‘वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेत या सेफ्टी सूटची माहिती देशातील महिलांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जास्तीत जास्त महिला-मुलींना या सेफ्टी सूटचा वापर करता येईल, यासाठी ते सहज परवडणाऱ्या किमतीत घेता येईल यावर लक्ष केंद्रित केले आहे. या सेफ्टी सूटचे उत्पादन मोठ्या संख्येने व्हावे यासाठी सध्या याची तांत्रिक चाचणी, पेटंट अशा विविध गोष्टींचे काम सुरू आहे.’’

- अंकिता रोटे

वूमन सेफ्टी सूट’
संपूर्ण शुल्क भरले नाही तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रक द्या; विद्यापीठाचे आदेश

वूमन सेफ्टी सूट’चे वैशिष्ट्ये ः

- वजनाने हलके व दिसायला सामान्य जॅकेट प्रमाणे

- जॅकेटमध्ये सेन्सर असल्याने ते चालू करताच त्यातून आवाज होतो

- यात असलेले सर्किट मोबाईलशी जोडलेले आहे

- मोबाईलच्या माध्यमातून लोकेशन व मदतीचा संदेश थेट पोलिस आणि कुटुंबीयांना

- एक विशेष बटणामुळे महिलेसोबत गैरवर्तन किंवा शारीरिक हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्याला विजेचा झटका बसतो

- सेफ्टी सूट परिधान केलेल्या महिलेला याचा धोका नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com