esakal | 'राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महिलांवर हात उचलतात; मला अजून न्याय नाही मिळाला'
sakal

बोलून बातमी शोधा

'राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महिलांवर हात उचलतात; मला अजून न्याय नाही मिळाला'

महिला सरपंच गौरी गायकवाड यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने आपल्याला कानाखाली मारली असा आरोप यामध्ये करण्यात आला आहे.

'राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महिलांवर हात उचलतात; मला अजून न्याय नाही मिळाला'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - पुण्यातील ग्रामीण भागात महिला सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता याबाबत महिला सरपंच गौरी गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला अजुनही न्याय मिळाला नाही असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महिलांवर हात उचलतात असा आरोप केला आहे. मला अजुनही न्याय मिळाला नाही, सुजित काळभोरने मला मारहाण केली. महिला सरपंच चांगलं काम करत असेल तर तिला हिंसेला सामोरं जावं लागतं. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महिलांवर हात उचलतात असंही सरपंच गौरी गायकवाड यांनी म्हटलं.

महिला सरपंच गौरी गायकवाड यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने आपल्याला कानाखाली मारली असा आरोप यामध्ये करण्यात आला आहे. याचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत असून भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संबंधित कार्यकर्त्यावर कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा: राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नगरसेवकांची कानउघाडणी

पुण्यात कदमवाकवस्ती भागात असलेल्या लसीकरण केंद्रावर महिला सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विटरवर संबंधित घटनेचा व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटलं की,'पुण्याजवळील कदमवाकवस्ती गावच्या लोकनिर्वाचित सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण झाली आहे. मारहाण करणारा कोण? तर तो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा.'

महिला सरपंचाला मारहाण प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं की, 'गृहखातं ज्या पक्षाकडे त्या पक्षाच्या आमदार व कार्यकर्त्यांना महिला अधिकाऱ्यांना गलीच्छ शिवीगाळ करणे त्यांना ॲट्रोसिटीच्या धमक्या देणे महिला सरपंचाला मारहाण करणे याचं लायसन्स दिलयं का ?? मुख्यमंत्री महोदयजी हे धक्कादायक चीड आणणारं आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं आहे अशा शब्दात चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

loading image
go to top