धक्कादायक! पैशाच्या वादातून महिलेला फेकले इमारतीवरून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

- कोरेगाव पार्कमधील घटना, एकाला अटक

पुणे : पैशाच्या वादातून तरुणाने महिलेला इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून ढकलून दिल्याने 30 वर्षीय महिला जागीच ठार झाली. त्यानंतर तरुणाने तिचा मृतदेह खडकीतील होळकर पुलाखाली टाकून पळ काढला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी अश्रफ सय्यद (वय 20) याला अटक करण्यात आली आहे. खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून कोरेगाव पार्क पोलिसांकडे वर्ग केला. ही घटना दोन दिवसांपूर्वी कोरेगाव पार्क परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेली महिला ही विवाहित असून राजगुरुनगर परिसरातील आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा ती पुणे स्टेशन परिसरातून जात होती. त्यावेळी महिलेने दुचाकीवर जाणाऱ्या आश्रफला लिफ्ट मागितली. रात्रीची वेळ असल्याने आश्रफने तिला लिफ्ट दिली. त्यानंतर महिलेने आश्रफला खडकीत सोडण्यास सांगितले. काही अंतरावर आश्रफने महिलेला रस्त्यात सोडण्याचा प्रयत्न केला असता, तिने येरवडा परिसरात सोडण्याचा हट्ट धरला. मात्र, उशीर झाल्यामुळे आश्रफने तिला येरवड्यात सोडण्यास नकार दिला.

खडसेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत मुनगंटीवार म्हणाले...

आश्रफने महिलेला कोरेगाव पार्क येथील त्याच्या बहिणीच्या घरी नेले. त्यानंतर दोघेही इमारतीच्या टेरेसवर गेले. त्यावेळी तरुणीने आश्रफलना दहा हजार रुपये देण्याची मागणी केली. यावरून दोघांत वाद झाल्याने आश्रफने महिलेला इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. त्यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिलेचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर एका साथीदाराच्या मदतीने आश्रफने दुचाकीवर महिलेचा मृतदेह नेऊन होळकर पुलाखाली टाकून दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Thrown by Person from Building in Pune