
Women's Day 2023 : बारामतीत महिलांची सायकल रॅली
बारामती - येथील बारामती नगरपालिका महिला व बालकल्याण विभाग, एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, भगिनी मंडळ व बारामती सायकल क्लब यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून सायकल रॅलीचे बुधवारी (ता. 8) आयोजन केले गेले.
तीन हत्ती चौकात मुख्याधिकारी महेश रोकडे, माळेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी स्मिता काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांनी रॅलीस झेंडा दाखविला. या रॅलीमध्ये 150 हून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला. काही युवकांनीही महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी रॅलीत सहभाग घेतला.
तीन हत्ती चौकातून भिगवण रस्त्याने रिंगरोडमार्गे पुन्हा गूल पुनावाला गार्डनमध्ये रॅली संपली. पूनावाला गार्डन येथे एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. रॅली पूर्ण करणा-या महिलांना नगरपालिकेने स्वच्छतादूत व स्वच्छतामित्र प्रमाणपत्र सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रदान केले.
महिलादिनानिमित्त प्रतिभा अनिल दाते, डॉ. नीता अनिलकुमार दोशी, लक्ष्मीप्रभा सतीश करे, योगिता राजन काळोखे, राधिका संजय दराडे व माधवी मुळीक यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, महेश रोकडे, आरती पवार, शुभांगी लोणकर, स्मिता काळे, सायकल क्लबचे अध्यक्ष अँड. श्रीनिवास वायकर, भगिनी मंडळाच्या प्रमुख विश्वस्त सुनीता शहा आदी मान्यवर उपस्थित होते. संगीता काकडे यांनी सूत्रसंचालन केले, भगिनी मंडळाच्या अध्यक्षा दीपा महाडीक यांनी आभार मानले.