esakal | #Women's Day : कृषिकन्या ते जगातील दिग्गज कंपन्यांना माहिती पुरविणारे स्टार्टअप
sakal

बोलून बातमी शोधा

rashmi chakote

बाजारात कोणत्या उत्पादनाची आवश्‍यकता आहे, यावर व्यवसायाचे यश अवलंबून असते. अशा मागणीची माहिती पुरविण्याची माहिती देणारे स्टार्टअप सुरू करीत या क्षेत्रात रश्‍मी चाकोते या तरुणीने आपला ठसा उमटवला आहे

#Women's Day : कृषिकन्या ते जगातील दिग्गज कंपन्यांना माहिती पुरविणारे स्टार्टअप

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पुणे- बाजारात कोणत्या उत्पादनाची आवश्‍यकता आहे, यावर व्यवसायाचे यश अवलंबून असते. अशा मागणीची माहिती पुरविण्याची माहिती देणारे स्टार्टअप सुरू करीत या क्षेत्रात रश्‍मी चाकोते या तरुणीने आपला ठसा उमटवला आहे. शेतकऱ्याची पोर ते जगातील दिग्गज कंपन्यांना माहिती पुरविणारे आंतरराष्ट्रीय स्टार्टअप स्थापन करण्यापर्यंतचा तिचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.सोलापूर येथून एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर रश्‍मी हिने काही दिवस पुण्यात या क्षेत्रात काम केले. रश्मीने नोकरी सोडून देत डिसेंबर २०१७ साली हे स्टार्टअप सुरू केले आहे. सध्या ती पुणे, मुंबई, सोलापूर, जमशेदपूर आणि चेन्नई या शहरातून काम करते. कॅनडात देखील या स्टार्टअपचे कर्मचारी कार्यरत आहेत. सप्लाय डिमांड मार्केट रिसर्च असे तिच्या स्टार्टअपचे नाव असून, सध्या त्यात ५० कर्मचारी काम करतात.

आघाडीच्या कंपन्या, एनजीओ, विद्यापीठे आणि सरकारी संस्था यांना सल्ला देण्याचे काम हे स्टार्टअप करते. एखादी वस्तू किंवा सेवा बाजारात एखादी कंपनी आणत असेल तेव्हा लोकांना नेमकं काय हवं आहे, याचा शोध घेऊन त्याची माहिती कंपन्यांना पुरविण्यात या स्टार्टअपचा हातखंडा आहे.

मराठा आरक्षण : सर्व राज्यांना पाठवणार नोटीस; पुढील सुनावणी आता 15 मार्चला

जगभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये मी सध्या काम करते आहे. आईवडिलांनी मोठे कष्ट करून मला शिक्षण दिले आहे. त्यांच्या कष्टाचे सार्थक झाले, याचा मला आनंद आहे. महिला आत्मनिर्भर होण्यासाठी आम्ही नोकरी देताना त्यांना प्राधन्य देतो. जगात अनेक ठिकाणी काम केले आहे, मात्र मला देशासाठी काम करायचे आहे. त्यामुळे इथेच राहून काम करणार आहेत, असं सप्लाय डिमांड मार्केट रिसर्चच्या  संस्थापक-संचालक रश्‍मी चाकोते म्हणाल्या.

loading image